

सोलापूर : शासनाने अनुदान दिलेल्या सर्व आश्रमशाळांमध्ये शिक्षण हक्क कायदा 2009 चा कायदा लागू होण्यापूर्वी ज्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, अशा शिक्षकांचा सेवाकाळ व निवृत्तीचा काळ पाच वर्षांपेक्षा जास्त असेल. अशा सर्वच आश्रमशाळेतील शिक्षकांना किमान 20 महिन्यांनंतर सेवासमाप्तीचा इशाराच देण्यात आला आहे. यामुळे, अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अनुदानित आश्रम शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना सेवेत कायम राहायाचे असेल तर, त्यांना 1 सप्टेंबर 2027 पूर्वीच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परिक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होत नाहीत. अशा संबंधित शिक्षकांना त्यांच्या नोकरीला मुकावे लागणार आहे. कारण, त्यांच्या शिक्षक सेवा समाप्ती करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
अनुदानित आश्रमशाळांमध्येही शिक्षक पात्रता (टीईटी) परिक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात केले आहे. यापुढे, अनुदानित आश्रमशाळांमधील पहिली ते आठवी वर्गात ज्ञानार्जन करत असलेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता ( टीईटी) उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करावी. ही परिक्षा उत्तीर्ण उमेदवार मिळेपर्यंत किवा उपलब्ध होईपर्यंत, ज्या त्या शैक्षणिक सत्राची समाप्ती होईपर्यंत त्या रिक्त पदावर कंत्राटी पद्धतीने पद भरती करावी. कंत्राटी शिक्षकास शासनाचे कोणतेही अनुदान अथवा सेवा विषयक लाभ मिळणार नाही.