

सोलापूर : आषाढी एकादशी २५ जुलै रोजी भरणार असून, पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या महाराष्ट्रातील १० प्रमुख मानाच्या पालख्यांचे प्रस्थान व सोलापूर जिल्हा हद्दीतील आगमनाचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
या सर्व मानाच्या पालख्या १६ ते २० जुलै या पाच दिवसांत जिल्ह्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
l श्री संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी : पालखी दि. ८ जुलै रोजी प्रस्थान करून दि. १९ जुलै रोजी सोलापूर जिल्हा हद्दीत दाखल होईल.
l श्री संत तुकाराम महाराज, देहू पालखी दि. ७ जुलै रोजी निघणार असून दि. २० जुलै रोजी जिल्ह्यात येईल.
l श्री संत मुक्ताबाई, मुक्ताईनगर पालखी दि. २४ जून रोजी प्रस्थान करून दि. १९ जुलै रोजी जिल्हा हद्दीत पोहोचेल.
l श्री संत सोपान महाराज, सासवड पालखी दि. १२ जुलै रोजी निघून दि. २० जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात येईल.
l श्री संत निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर पालखी दि. २९ जून रोजी प्रस्थान करून दि. १८ जुलै रोजी जिल्हा हद्दीत दाखल होईल.
l श्री संत एकनाथ महाराज, पंढरपूर पालखी दि. ७ जुलै रोजी निघणार असून दि. १९ जुलै रोजी जिल्ह्यात येईल.
l श्री संत गजानन महाराज, शेगाव पालखी दि. २१ जून रोजी प्रस्थान करून दि. १७ जुलै रोजी सोलापूर जिल्हा हद्दीत दाखल होईल.
l श्री विठ्ठल-रुक्माई संस्थान, कौंडण्यपूर पालखी दि. १९ जून रोजी निघून सर्वात प्रथम दि. १६ जुलै रोजी जिल्ह्यात येणार आहे.
l श्री संत चांगावटेश्वर देवस्थान, सासवड पालखी दि. १२ जून रोजी प्रस्थान करून दि. २० जुलै रोजी जिल्हा हद्दीत दाखल होईल.
l श्री संत निळोबाराय महाराज, पिंपळनेर पालखी दि. १० जुलै रोजी निघून दि. १९ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात येईल.
१९, २० जुलैला एकूण सात पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात होणार आगमन
१९ जुलै रोजी ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, एकनाथ महाराज व निळोबाराय महाराज अशा ४ पालख्या, तर २० जुलै रोजी तुकाराम महाराज, सोपान महाराज व चांगावटेश्वर देवस्थान अशा ३ पालख्या एकाच दिवशी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक पालखीसाठी नोडल व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. वारकरी व नागरिकांनी प्रवासात अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष क्र. ०२१७-२७३१०१० येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.