Ashadhi Wari | दोन लाख वारकर्‍यांना मिळाली सेवा

239 रेल्वेगाड्या, 121 विशेष तर 118 नियमित गाड्यांची सोय
Ashadhi Wari |
Ashadhi Wari | दोन लाख वारकर्‍यांना मिळाली सेवाPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : रेल्वेच्या सोलापूर विभागाने आषाढी एकादशीच्या काळात वारकर्‍यांना सहजतेने वारी करता यावी यासाठी नियमित व विशेष असे 239 गाड्या सोडले होते. यामुळे दोन लाख वारकर्‍यांंनी यंदाची वारी रेल्वेने केली आहे. वारीसाठी ही उत्तम सोय विठ्ठल भक्तांसाठी झाली होती. 1 ते 10 जुलै दरम्यान, या रेल्वे प्रवाशी गाड्यांची सोय होती. यादरम्यान 121 विशेष तर 118 नियमित गाड्या रेल्वेच्या एकेरी पटरीवर धावलेल्या आहेत.

यंदा, भाविकांचा रेल्वेने वारी करण्याकडे कल वाढल्याचे दिसून आले. येथील स्थानकाच्या एकाच मार्गावर या विभागातील 239 गाड्या चालवण्याचा विक्रम झाला आहे. एकादशीला 22 व द्वादशीला 18 गाड्या धावल्या आहेत.

अपघाताविना वारी : गर्दीत मोठी वाढ झाले तरी कार्यक्षम व्यवस्थापनाच्या टीमवर्कने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मानवता व कृती : वयोवृद्ध वारकर्‍यांना गाडीत चढण्यापासून ते वैद्यकीय मदत करण्यापर्यंत रेल्वेचे कर्मचारी यंदा आध्यात्मिक सेवक बनून काम केले. विशेष म्हणजे रेल्वे कर्मचार्‍यांनी उत्तम सहकार्य केले.

व्यवस्था व उपक्रम : तिकिटाची उपलब्धी सहज व्हावेत यासाठी नियमित 2, यूटीएस विंडो, 4 एटीव्हीएम टर्मिनल व 1 पीआरएस विंडोसह अतिरिक्त 9 यूटीएस काउंटर, 2 एटीव्हीएम, 5 मोबाईल यूटीएस टर्मिनलची सेवा वाढवल्याने रांगेशिवाय तिकीट मिळाली. वारकर्‍यांनीही रेल्वेच्या या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.

आरोग्य व आपत्कालीन : 3 डॉक्टरांसह 13 आरोग्य कर्मचार्‍यांची वैद्यकीय टीमची 24 तास नियुक्ती केली होती. स्वच्छता व स्वच्छता : 150 हून अधिक मोबाईल टॉयलेट, 60 कायमस्वरूपी टॉयलेट, 20 बाथरूमची सोय केली होती.

पाणी व अल्पोपहार : 91 नळासह मोफत ज्यूसची सोय केली होती. यातून वारकर्‍यांना भोजनाची व अल्पोपहाराची उत्तम सोय झाली होती.

यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, सुरक्षा आयुक्त, आदित्य, सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजीव कनोजिया, सहाय्यक परिचालन व्यवस्थापक लखनजी झां यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचार्‍यांची वारीच्या काळात होती.

रेल्वेने पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नियमित व विशेष गाड्यांची सोय केली होती. शिवाय, अन्य राज्यासह राज्यातील कानाकोपर्‍यातील वारकर्‍यांना रेल्वेची सेवा देण्याचा प्रयत्न केला. शिवाय, पंढरपुरात वारकर्‍यांना खरचटले तरी त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी अशी यंत्रणा उभी केली होती.
- योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे सोलापूर विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news