Ashadhi Wari: लऊळमध्ये संत एकनाथ महाराज पालखीचे स्वागत

श्री संत कुर्मदास मंदिरात भरला भक्तीचा मेळा
Ashadhi Wari: लऊळमध्ये संत एकनाथ महाराज पालखीचे स्वागत
Published on
Updated on

लऊळ : श्री संत कुर्मदास महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या लऊळ (ता. माढा) या ठिकाणी मंगळवारी एकनाथ महाराजांचा जयघोष करीत टाळमृदंगाच्या गजरात आलेल्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. कालचा कुर्डू येथील मुक्काम उरकून आज सकाळी गावात पालखी दाखल झाली.

लऊळ येथील विठ्ठल मंदिरामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विठ्ठल मंदिरातील भोजनाचा आस्वाद घेऊन पालखी कुर्मदास मंदिराकडे मार्गस्थ झाली.

यावेळी सरपंच लक्ष्मण भोंग, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार माढेकर, मंडल अधिकारी पुरुषोत्तम शिंदे, गावकामगार तलाठी समाधान पाटील अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या सीआरपीओ, आरोग्यसेविका, भजनी मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी बंडू चांदणे, अक्षय लोकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news