Ashadhi Wari: वारीसाठी १० कोटींची औषध खरेदी

आरोग्य विभागाची तयारी; २४ तास वैद्यकीय यंत्रणा सज्ज
Ashadhi Wari
Ashadhi Wari
Published on
Updated on

सोलापूर : आषाढी वारीत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी सोलापूर जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्य विभागाने दहा कोटींच्या औषधांची खरेदी केली आहे. यामध्ये सोलापूरसाठी ६ कोटी ५३ लाख, सातारासाठी १ कोटी ३० लाख आणि पुणेसाठी २ कोटी ९० लाखांच्‍या औषधांचा समावेश आहे.

वारीनिमित्त तब्बल ६५ ते ९० लाख गोळ्या, सर्दी-खोकल्याच्या ४८ लाख गोळ्या, तीन लाख सिरपच्या बाटल्या, जंतुनाशक औषधांच्या ४० लाख गोळ्या, सहा लाख ओआरएस पाकिटांचा साठा, संसर्गजन्य आजारांवर उपचारासाठी १५ लाख प्रतिजैविकांचा साठा आणि सिरपच्या ११ ते १२ हजार बाटल्या राखीव ठेवल्या आहेत.

वारी मार्गावरील सर्व आरोग्य केंद्रे, वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी २४ तास कार्यरत राहतील. गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी विशेष नियोजन केले आहे.
- डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्‍हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news