Ashadhi Wari Moharam Celebration | मोहरम, आषाढीमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

मंगलबेडा सवारीला विठ्ठलाचा तुळशीहार, तर सवारीकडून विठ्ठलालाही तुळशीहार अर्पण
Ashadhi Wari Moharam Celebration
सोलापूर : मोहरमच्या सवारीला विठ्ठलाचा तुळशीचा हार अर्पण करण्यात आला.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूरने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन वारंवार दिले आहे. अठरापगड जाती-जमातींच्या सहभागातून मोहरम उत्सव साजरा करताना सामाजिक आणि सांस्कृतिक एकोपा दिसून येतो. रविवारी दुपारी मोहरम उत्सवाची सवारी निघाली. यंदा मोहरम आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने पीर बडा मंगलबेडा (अहले हरम) सवारीला चौपाड विठ्ठल मंदिरातून विठ्ठलाचा प्रिय असलेला तुळशीहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सवारीकडून विठ्ठलाला तुळशीहार अर्पण करत हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडविले.

थोरला मंगळवेढा तालीम येथील प्रसिध्द बडा मंगलबेडा (अहले हरम) सवारीची अडीचशे वर्षांची परंपरा आहे. मूळ मंगळवेढ्यातून सोलापुरात कसबा पेठेत राजपूत समाजातील दीक्षित कुटुंबीयांच्या ताब्यात आलेल्या या सवारीची पूजाअर्चा मुजावर कुटुंबामार्फत वंश परंपरेने केली जाते. या सवारीच्या प्रथम दर्शनाचा मान विमुक्त भटक्या वडार व अन्य उपेक्षित समाजाला दिला जातो. राजपूत, मराठा, धनगर, मुस्लीम, गवळी, लोणारी, गवंडी, सुतार, पिंजारी, मोची, बुरूड, माळी, सोनार, तेली, कोष्टी, कासार आदी समाजाच्या भाविकांची मोठी श्रध्दा आहे.

Ashadhi Wari Moharam Celebration
Solapur News | प्रकल्प बाधित शेतकर्‍याने जीवन संपवले

रविवार दि. 6 जैल रोजी सकाळी मोहरमच्या शहादत दिनी बडा मंगलबेडा सवारीची मिरवणूक हलगी, ताशा, संगीत बन्डसह वाजत-गाजत निघाली. हा मिरवणूक सोहळा चौपाड मंदिराजवळ पोहोचला. तेव्हा आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या भाविकांनी सवारीचेही दर्शन घेतले. विठ्ठलाला प्रिय मानला जाणारा तुळशीहारही मंदिरातून आणून सवारीला अर्पण केला गेला. मंदिराचे प्रमुख विश्वस्त रमेश खरात आणि मुख्य पुजारी नितीन कुलकर्णी यांनी ही सेवा रुजू केली. त्यानंतर सवारीच्यावतीनेही मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींना तुळशीहार आणि श्रीफळ अर्पण करण्यात आला.

Ashadhi Wari Moharam Celebration
Konkan Ashadhi Wari Moharam Celebration | कोकणात आषाढी, मोहरम सण आज होणार साजरे

कोणताही गाजावाजा न करता ही कृती तेवढ्याच सहजपणे झाल्याचे दिसून आले. वाटेत महिला भाविकांनी जलकुंभाद्वारे सवारीचे पदप्रक्षालन केले. शहरात सुमारे 250 पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेले सहा दिवस विशिष्ट पंजांच्या मिरवणुका निघाल्या. बडे मौला अली, अकबर अली, घोडेपीर, दुर्वेश पंजे, तलवार पंजे, मुस्लीम पंजे आदी पंजांच्या मिरवणुका रीतीरिवाजाप्रमाणे काढण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news