

सोलापूर : आषाढी वारीसाठी सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातून विविध संतांच्या पालख्या मार्गाक्रमण करतात. पालख्यांसोबत असलेल्या भाविकांना मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था व इतर आवश्यक सुविधा देण्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेला चार कोटी 80 लाख 90 हजार तर सातारा जिल्हा परिषदेला 56 लाख 26 हजार 500 रुपयांचा निधी राज्य शासनाने दिला आहे.
यात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र व ड्रोन सुविधा उपलब्धतेसाठी 80 लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे आषाढी वारीत वारकर्यांना सुविधा उपलब्ध करण्यास मदत होणार आहे. येत्या सहा जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी दिंड्या व पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत. हा निधी 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास या योजनेंतर्गत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून दिला आहे. या योजनेसाठी 100 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. त्यातून ही निधी दिला आहे.
पहिल्या टप्यात सोलापूर जिल्हा परिषदेला मंजूर रकमेच्या 75 टक्के प्रमाणात तीन कोटी 60 लाख 67 हजार 500 रुपये तर सातारा जिल्हा परिषदेला मंजूर रकमेच्या 75 टक्के प्रमाणात 42 लाख 19 हजार 875 रुपये इतका निधी याद्वारे दिला आहे. पालख्यांचे जिल्ह्यात आगमन होण्यापूर्वी त्यांना सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
38 मुक्काम ठिकाणी वाटरप्रुफ मंडप व्यवस्था, जर्मन हँगर, गुरसाळे येथील एकात्मिक सुविधा केंद्र अंतर्गत सुविधा उपलब्ध करणे : दोन कोटी 15 लाख 90 हजार
कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र व ड्रोन सुविधा : 80 लाख
प्रचार प्रसिद्धी, जनजागृती : 40 लाख
हिरकणी कक्षांतर्गत सुविधा : 10 लाख
एकूण : 4 कोटी 80 लाख 90 हजार
तात्पुरते स्वच्छतागृह : 85 लाख
महिला स्नानगृह : 50 लाख