Ashadhi Wari : पालखीसाठी १७० हिरकणी कक्ष

आषाढी वारी : महिला व बालकल्‍याणचे ४७० कर्मचारी देणार सेवा
Ashadhi Wari
Ashadhi Wari
Published on
Updated on

सोलापूर : आषाढी वारीनिमित्त लाखो महिला वारकरी, भाविक सोलापूर जिल्‍ह्यात दाखल होत असतात. त्‍या महिला वारकऱ्यांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्‍यात, यासाठी पालखी मार्गावर १७० हिरकणी कक्षांची सोय करण्यात आली आहे. त्‍या कक्षात महिलांसाठी विविध सोयी-सुविधा देण्यात आल्‍या असून, त्‍यासाठी 364 अंगणवाडी सेविकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखीसह इतर मानाच्‍या पालख्याबरोबर लाखो महिला वारकरी, भाविक जिल्‍ह्यात दाखल होत असतात. त्‍यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महिला व बालकल्‍याण विभागाकडून १७० हिरकणी कक्षांची सोय करण्यात आली आहे. या कक्षात महिलांसाठी बेड, सॅनिटरी पॅड, खुर्ची, मॅट, सॅनिटरी पॅड व्‍हेंडींग मशिन आदी सोय करण्यात येणार आहे.

वारीत सहभागी होणाऱ्य महिलांना सोयी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन विविध योजना आखत आहे. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावर विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या हिरकणी कक्षामुळे महिला वारकऱ्यांची उत्तम सोय होणार आहे.

दरम्‍यान, पालखी मार्गावरील हिरकणी कक्षाला महिला आयोगाच्‍या अध्यक्षा भेट देऊन कक्षातील सोयी-सुविधांची पाहणी करुन विविध सोयी-सुविधा देण्याच्‍या सूचना करतात. यंदाच्‍या वर्षी मागीलवेळीच्‍या सूचनाचा विचार करुन महिलांसाठी स्‍नागृह, शौचालयांची स्‍वतंत्र व्‍यवस्‍था महिला व बालकल्‍याण विभागाकडून करण्यात आल्‍याची माहिती महिला व बालकल्‍याण विभागाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news