

सोलापूर : आषाढी वारी होईपर्यंत प्रवाशांची गैरसोयी होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) जिल्हा प्रशासनातील सर्वच उच्च पदस्थ अधिकारी हे मुक्कामासाठी विठ्ठल दरबारीच आहेत. जिल्हा प्रशासनासह एसटीच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या कानाकोपर्यातील तसेच परराज्यातील नागरिक लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला येतात. शिवाय, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र व अन्य राज्यातील वारकरी मोठ्या प्रमाणात येत येतात. यांना वाहतुकीची कोणतीही अडचण येऊ नये यासाठी एसटीचे आगार व्यवस्थापकासह, विभाग नियंत्रक, स्थानक प्रमुख, विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय यंत्र अभियंता, उपयंत्र अभियंता, सांख्यिकी अधिकारी, विभागीय लेखा अधिकारी, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, कामगार अधिकारी व लेखाकार आदी प्रशासनातील अन्य उच्च पदस्थ अधिकारी हे वारीच्या नियोजनासाठी विठ्ठलाच्या दरबारीच आहेत.
वाहतुकीच्या दरम्यान वारकर्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हे अधिकारी पथकासह आषाढीपर्यंत पंढरपुरात राहणार आहेत. वारकर्यांना प्रवासाची सुविधा देण्यात एसटीकडून अडचणी भासू नयेत. यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारीसाठी जिल्ह्याची टीम येथे उतरलेली आहे. शिवाय, या दरम्यान राज्याच्या एसटीसह अन्य परराज्यातून आलेल्या एसटी बसचे वाहक व चालक यांनाही अडचणी येऊ, यासाठी हे पथक येथे काम करणार आहे.