Solapur News: स्वीकृत सदस्यांची लॉटरी आज फुटणार; 62 पैकी दहाजण कोण भाग्यवान

तडवळकर, पाटील, आळ्ळीमोरे, चालुक्य, दायमा, थोरात, आंजिखाने, सालार यांची नावे चर्चेत
Solapur
SolapurPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या 10 जागांसाठी 62 अर्ज दाखल झाले आहेत. भाजपने 20 इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, स्वीकृत नगरसेवकसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्य, स्थायी समिती, परिवहन समिती सदस्य असे 38 सदस्य निवडले जाणार आहेत. स्वीकृत सदस्यासाठी मोठी चुरस आहे, त्यामुळे कोणाला लॉटरी लागणार यांचीही उत्सुकता आहे. तडवळकर, पाटील, आळ्ळीमोरे, चालुक्य, दायमा, थोरात आंजिखाने, सालार यांचे नावे आघाडीवर आहेत.

सोलापूर महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बोलवण्यात आली आहे. या सभेमध्ये 10 स्वीकृत सदस्य, स्थायी समितीचे 16 तर परिवहन समितीच्या 12 सदस्यांची नियुक्ती होणार आहे. नूतन महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. 10 स्वीकृत सदस्यांसाठी बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत महापालिकेतील आयुक्त कार्यालयात अर्ज स्वीकृती प्रक्रिया पार पडली. दहा जागांसाठी 62 अर्ज दाखल झाले होते. यातून भाजपकडून 9 तर एमआयएमकडून एक असे दहा सदस्य निवडले जाणार आहेत.

भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, प्रभाकर जामगुंडे, जगदीश पाटील, शशी थोरात, अक्षय आंजिखाने, श्रीनिवास दायमा, सुधा अळळीमोरे, श्रीकांत घाडगे, जवाहर जाजू, अनुप खंडेलवाल, केतन शहा, वृषाली चालुक्य, पांडुरंग दिड्डी, ॲड. राजन दीक्षित, ॲड. साधना संगवे , सूरज चव्हाण, कृष्णा झंवर, महेश तापडिया, लक्ष्मीकांत दरक, मल्लिनाथ राचेटि, सोमनाथ केंगनाळकर, रुद्रेश बोरामणी, देवेंद्र भंडारे, नागेश भोगडे, सचिन कुलकर्णी, जय साळुंखे तर एमआयएमएमकडून नईम सालार, गाजी जहागिरदार, फिरदौस पटेल यांच्यासह अपक्ष म्हणून विविध संस्थांचे पदाधिकारी असे एकूण 62 इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. यातील 11 जण भाग्यवान कोण ठरणार, कोणाला स्वीकृतची लाटरी लागणार यांची उत्सकता लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news