सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी.ची पूर्व परीक्षाही 21 जुलैला होणार आहे. दरम्यान, 13 जूनपासून पेटसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एक हजार एकशे जणांनी अर्ज केले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. सहा जुलैपर्यंत पेटसाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.
विद्यापीठाच्या पेट परीक्षेसाठी एकूण 474 जागांसाठी पेट नऊ परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी 13 जूनपासून अर्ज करण्याची लिंक खुली झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत 1100 जणांनी पेट नऊसाठी अर्ज भरले आहे.
21 जुलैला होणार पेट नऊसाठी परीक्षा
पेटसाठी वेब बेस्ड सिस्टिम, देशातील-परदेशातील विद्यार्थ्यांना देता येईल घरबसल्या पेट
दोन सत्रांत होतील पेटचे दोन पेपर
ऑनलाईन लॉगिन केल्यावर पेपर सोडविण्यासाठी असेल एक तासाचा वेळ
18 ते 20 जुलैला होणार विद्यार्थ्यांचीच
पूर्व तयारीची ऑनलाईन मॉक टेस्ट
दोन विषयांतून पेट देणार्यांसाठी 22 जुलैला परीक्षा, तसेच 21 जुलैला स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची पेट परीक्षाही 22 जुलैला घेणार, मात्र त्यांनी नाव, माहिती मेल करणे गरजेचे.