

तुळजापूर : ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांना पुणे शहरातील तळेगाव दाभाडे येथून तर सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आलेला आणखी एक आरोपी स्वराज उर्फ पिनू तेलंग या दोघांना अटक करून तामलवाडी पोलिसांनी मंगळवारी धाराशिव जिल्हा न्यायालयासमोर हजर केले त्यांना सोमवारपर्यंत (4 ऑगस्ट) पोलिस कोठडीत सुनावण्यात आली.
तुळजापूर येथील गाजलेल्या ड्रॅग्ज प्रकरणातील अनेक दोषी आरोपींचा तीन महिने उलटून गेले तरी शोध घेण्यात पोलिस व तपास यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने पोलिसांचे सर्वदूर वाभाडे निघत होते. त्यातच पालकमंत्री ना.प्रताप सरनाईक यांनी गेल्या रविवारी तुळजापूर भेटीत या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊन वरिष्ठ अधिकार्यांची कानउघाडणी केली होती.
यावेळी ना. सरनाईक यांनी 15 ऑगस्टपर्यंत सर्व आरोपींना अटक करण्याची ताकीद पोलिस यंत्रणांना दिली होती. यानुसारच हि कारवाई सुरू केली आहे.