

सोलापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाकडून सध्या केंद्रीय अनुसूचित जाती विकास महामंडळाच्या सहयोगातून बीजभांडवल योजनेतून पाच लाख रुपये पर्यंतची कर्ज योजना सुरू आहे. यातून कर्जदाराला आठ टक्के व्याजदराने थेट कर्ज मिळणार आहे.
राज्यातील मातंग, मोची, मादिगा, मदार या अनुसूचित जाती प्रवर्गातील समूहाच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ काम करते. या माध्यमातून या समाजातील तरुणांसाठी अनुदानासह थेट कर्ज योजना राबवली जाते. सध्या, राज्य शासनाकडून या महामंडळाला उद्दिष्ट प्राप्त झाले नाही. केंद्रीय अनुसूचित जाती महामंडळाकडून बीज भांडवल योजनेतून लाभार्थ्याला थेट पाच लाखापर्यंत कर्ज योजनेच्या माध्यमातून विविध उद्योग व्यवसायासाठी आठ टक्के व्याजदराने कर्ज मिळते. अन्य योजनेसाठी निधी प्राप्त झाल्यावर त्याही योजना सुरू होणार आहेत. शिवाय, राज्य शासनाकडून प्रस्तावित योजनांसाठीचे अनुदानही मिळाले नाही.