अंगणवाडी इमारत केली भुईसपाट; प्रशासन ढिम्म

पोलिसांत तक्रार, तरी अद्याप गुन्हा दाखल नाही; सध्या मंदिरात भरते अंगणवाडी
Anganwadi building made ground floor
करमाळा : अंगणवाडी पाडण्यात आलेले ठिकाण. Pudhari photo
Published on
Updated on

करमाळा, पुढारी वृत्तसेवा : झरे तालुका करमाळा येथील अंगणवाडी क्रमांक 16 ही अज्ञात इसमानी एका रात्रीत भुईसपाट करून अज्ञाताने त्याचा ढिगाराही रातोरात गायब करून खळबळ माजवली आहे. याबाबत तब्बल दोन महिने उलटले तरीही साधा गुन्हाही दाखल झालेला नाही. अद्याप याचा तपास लागत नसल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चा होत आहे. अज्ञात इसमाने 20 जुलै रोजी एका रात्रीतच भर मध्यवस्तीत असणारी अंगणवाडी भुईसपाट करून अंगणवाडीतील मुलांच्या साहित्यासह सर्वच माती, दगडाचा ढिगारा गायब करून अंगणवाडीचे अस्तित्व होते की नव्हते करून टाकले. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला असल्याची चर्चाही ग्रामस्थांमधून होत आहे.

अंगणवाडी भुईसपाट करून त्याचा ढिगाराही रातोरात गायब केल्याने सकाळी त्या मुलांना शाळा दिसेनाशी झाली. ग्रामस्थही या प्रकाराने चक्रावून गेले. याची माहिती अंगणवाडी मदतनीस शैला औदुंबर मोरे यांनी फोनद्वारे पर्यवेक्षकांना कळवली. त्यानंतर 22 जुलै रोजी लेखी पत्राद्वारे बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांना याची माहिती देण्यात आली. स्थानिक प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सोमनाथ जाधव यांनी याबाबत सर्वत्र तक्रारी केल्यानंतर इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याचा प्रकार उघड झाला. ही इमारत पाडण्यामागे प्रशासनाचा अथवा अज्ञाताचा हेतू काय होता, ही बाब पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे.

Anganwadi building made ground floor
कोल्हापूर : भुदरगडमध्ये ३५ गावांत अंगणवाडी मदतनीस भरती

याबाबत घटनास्थळाचा बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी तसेच ग्रामसेवक, गावातील स्थानिक लोकांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला होता. त्याठिकाणी इमारतीचे अवशेष, साहित्य याचा लवलेशही नव्हता. याठिकाणी भरणारी अंगणवाडी ही इतरत्र भरण्यासाठी पर्यवेक्षकांना आदेश करण्यात आले होते. याबाबत प्रहार संघटनेचे सोमनाथ पवार यांनी इमारत पाडू नये यासाठी प्रशासनाला सतर्क केले होते. दुसरी अंगणवाडी उभारल्याशिवाय ही अंगणवाडी पाडू नये तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, विद्यार्थी यांचा विचार करून निर्णय घ्यावा, असे लेखी पत्र प्रशासनाला दिले होते. तरीही अज्ञाताने विनापरवानगी ही इमारत नेस्तनाबूत केली.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून अंगणवाडीला इमारत नसल्याने चिमुकल्या बाळांचा मात्र हिरमोड झाला असून हक्काच्या इमारतीत ही अंगणवाडी भरत नाही, याचे शल्य ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. याचा कसून तपास होऊन या प्रकारामागे असणारे सत्य बाहेर काढून त्या संबंधित लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे

Anganwadi building made ground floor
सिंधुदुर्ग: विविध मागण्यांसाठी अंगणवाडी मदतनिसांचा जि.प.समोर ठिय्या
इमारत विनापरवानगी पाडली ही वस्तुस्थिती आहे. इमारत जि.प.च्या मालकीची असल्याने त्यांच्याकडे याबाबत अहवाल दिला असून त्यांनी याबाबत संबंधितावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.
- मनोज राऊत गटविकास अधिकारी, पंचायत समिती, करमाळा
झरे येथील अंगणवाडीची इमारत परवानगी न घेता अज्ञात इसमानी ती भुईसपाट करून त्याची विल्हेवाट लावली आहे. याबाबत करमाळा पोलिसांमध्ये लेखी पत्राद्वारे तक्रार दिली आहे. अद्याप त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्या इमारत पडल्याने अंगणवाडी ही मंदिरात भरत आहे.
- आनंद जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी
21 एप्रिलच्या रात्री ही अंगणवाडीची इमारत पाडून त्यातील साहित्य गायब करण्यात आले. अंगणवाडी पाडली जाणार असल्याची आगाऊ कल्पना मी ग्रामविकास अधिकार्‍यांना दिली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचा गांभीर्याने तपास होणे आवश्यक आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
- सोमनाथ जाधव, अध्यक्ष, प्रहार संघटना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news