सोलापुरातील मिरवणुकीत फक्त एक टॉप, एक बेसच लावा

Ambedkar Jayanti 2025 : पोलिस आयुक्त एम. राजकुमार; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांतता कमिटीची बैठक
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025
सोलापूर : बैठकीत सहभागी झालेले मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.pudhari photo
Published on
Updated on

सोलापूर ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणूक रविवारी (दि. 20) निघणार आहे. या मिरवणुकीत एक बेस आणि एकचटॉप स्पीकर लावत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाची मर्यादा पाळावी. शांततेच्या मार्गाने डॉ. आंबेडकर जयंती साजरी होण्यासाठी पोलीस आपल्या पाठीशी असल्याचे मत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शांतता कमिटी बैठकीत केले.

पोलीस आयुक्तालयात सोमवारी दि.7 झालेल्या बैठकीत दोन्ही मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस उपायुक्त अजित बोर्‍हाडे, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त राजन माने, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, यशवंत गवारी, सुधीर खिडकर, महापालिकेचे सारिका कुलवार, आरटीओचे अधिकारी, महावितरण, अग्निशामक, धर्मादाय आयुक्तचे अधिकारी यांच्यासह राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, के. डी. कांबळे, अजित गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, आनंद चंदनशिवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले, महामानव डॉ. आंबेडकर जयंती ही साजरी करण्यात टॉप तीनमध्ये सोलापूर हे प्रथम क्रमांकावर आहे. नागपूर तिसर्‍या तर मुंबई दुसर्‍या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमण यांनी केले. प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे यांनी केले. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी देशमुख पाटील वस्ती, देगाव नाका येथून येणार्‍या मिरवणुका येतात. या मंडळांसाठी मिरवणुकीत गाड्या सजवण्यासाठी त्यांना फौजदार चावडी ते भैय्या चौक दरम्यान जाणारा रस्ता दिला जाईल.

भैया चौक येथे जड वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने बॅरिकेट लावले आहेत. यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. देगाव परिसरातील दहा ते पंधरा मंडळे मिरवणूक कशी काढणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. रेल्वे प्रशासनाला आम्ही निवेदन दिले आहे. हे बॅरिकेट नाही काढले तर आम्ही डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.

आनंद चंदनशिवे, विश्वस्त बोधीसत्व डॉ. आंबेडकर मध्यवर्ती मंडळ

न्यू बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्वरीत बसवावा. जेणेकरून अभिवादनासाठी अनुयायांना जाता येईल. यासाठी महापालिका प्रशासनाने त्वरित याची दखल घ्यावी.

राजाभाऊ इंगळे, विश्वस्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news