Akkalkot meat sale ban: अक्कलकोटमध्ये यापुढे गुरूवारी मांस विक्री बंद

भक्तांतून निर्णयाचे स्वागत : यापूर्वी मावाबंदी
meat sale ban
meat sale banPudhari Photo
Published on
Updated on

हंजगी : अक्कलकोट नगरपरिषद नगराध्यक्ष पदाची निवड होताच नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड आणि सर्व नगरसेवक हे समर्थांच्या नगरीत धाडसी निर्णय घेताना दिसून येत आहेत. आता अक्कलकोट शहर व परिसरात दर गुरुवारी मांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

यापूर्वी अक्कलकोट शहरात मावा विक्रीचा अतिरेक झाला होता. माव्याच्या व्यसनात अडकून अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद होत होते. त्यामुळे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी आणि सर्व नगरसेवकांनी शहरात मावाबंदीचा धाडसी निर्णय घेतला.

स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो भाविक-भक्त दर्शनासाठी येत असतात म्हणून आत शहरातील गुरुवारी मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या धाडसी निर्णयाचे अक्कलकोटकरांमधून स्वागत होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाविक-भक्तांकडून दर गुरुवारी मांस विक्रीवर बंदी आणण्याची मागणी केली जात होती. स्वामी समर्थांच्या भाविक-भक्तांच्या मागणी आता नुतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी आणि अक्कलकोट नगरपरिषदेनी पूर्ण केल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news