

टेंभुर्णी : आपला पक्ष शाहू, फुले व आंबेकरांच्या विचार धारेवर चालणारा आहे. चुकीचे वक्तव्य करतो, त्यास परखडपणे उत्तर देणारा केवळ कणखर नेता अजित पवार हेच आहेत.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहन कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी केले.ज्यांना उभे राहायचे आहे त्यांनी आपला कार्यकर्ता कोण आहे, हे बघून तयारीला लागा. निवडणूका कधीही जाहीर होऊ शकतात, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी केले.
माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नगोर्ली (टेंभुर्णी) येथील फार्म हाऊस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, शिवाजी कांबळे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कृषिमंत्री ना. भरणे पुढे म्हणाले की, ना. अजित पवार हा कामाचा माणूस आहे. त्यांनी सर्वात जास्त मदत सोलापूर जिल्ह्याला केली आहे. यामुळे लोकांच्या अडीअडचणी समजून घ्या. त्यांच्यात मिसळा. शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या मिळवून देण्यासाठी मदत केली पाहिजे. सरकार करेल म्हणून वाट पाहू नका.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. यावेळी पंढरपूरचे कल्याणराव काळे, निमगांव (टें) सरपंच यशवंत शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, दादासाहेब साठे, नगराध्यक्ष मीनल साठे, रामेश्वर मासाळ, कार्याध्यक्ष बाळासाहेब बंडगर, उदय माने, सुरेश पालवे, ॲड. नितीन भोसले, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, युवती जिल्हाध्यक्ष ऋतुजा सुर्वे, अतुल शिंदे, मोतीराम चव्हाण, नजीर इनामदार, प्रशांत भालशंकर,अण्णासाहेब पाटील, गोरख खटके, सागर ताड, हनुमंत मांढरे, रमेश पाटील, विशाल वाघमारे, प्रदेश संघटक आप्पासाहेब थिटे उपस्थित होते.