

सोलापूर : विजापूर रोडवरील नावीन्यपूर्ण प्रकल्प बनविण्यासाठी प्रसिद्ध असणार्या ए.जी.पाटील अभियांत्रिकी कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ब्लड प्रेशर चेकिंग कम मसाजर मशिन बनवली.
अंतिम वर्षाच्या प्रकल्पांतर्गत निर्मिती केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.व्ही. पोतदार यांनी दिली. या मशिनचा उपयोग गृहिणी, वृद्ध माणसे, ट्रेकर्स, मेडिकल फिल्ड मध्ये काम करणारे यांना विशेष करून होईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
मशिनची निर्मिती ही शिवराज पाटील, गुरुराज पाटील आणि वीरभद्र पाटील यांनी केली असून, मेकॅनिकल विभागाचे प्रा. उपाध्ये एस.एन. यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रा. लिगाडे एस. जे. यांनी इलेक्ट्रॉनिक पार्ट संदर्भात मार्गदर्शन केले. विभागप्रमुख डॉ. एस.बी. गदवाल, प्राचार्य डॉ.व्ही. व्ही. पोतदार,कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम.ए. चौगुले, संस्थेचे ट्रस्टी एस. एस. पाटील व संस्थेचे अध्यक्ष एस. ए .पाटील यांनी प्रकल्पात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या मशीनचा उपयोग व्यक्तींचा ब्लडप्रेशर जाणून घेण्यासाठी तर होतोच त्याचबरोबर याचा उपयोग दुखापतग्रस्त स्नायूंना मसाज करण्यासाठी होतो. साधारणपणे या दोन्ही गोष्टींसाठी दोन वेगवेगळ्या मशीन्सची गरज भासते, या प्रॉब्लेम वर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी या मशीनची निर्मिती केली.