Solapur News| पंचनाम्याचा फार्स नको, सरसकट मदत द्या : ॲड. गणेश पाटील

दुष्काळ जाहीर झालेल्या ठिकाणी पंचनामा करण्याची गरज नाही
Drought situation
दुष्काळ स्थिती
Published on: 
Updated on: 

भोसे (क.) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महसूल तसेच कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी तसेच उजनी कालवालगतची आता हिरवी असलेली पिके भविष्यात पाण्याअभावी जळूनच जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने पंचनाम्याचा फार्स न करता सरसकट मदत करावी, अशी मागणी भोसेचे सरपंच ॲड. गणेश पाटील यांनी केली आहे.

शासनाने राज्यात काही तालुके वगळता इतरत्र दुष्काळ असल्याचा जीआर काढला आहे. त्यानुसार प्रशासनाकडून सध्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधील खरिपाची (मका, कांदा, ज्वारी, बाजरी) पिके घेतलेली आहेत. त्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, दुष्काळी यादीतून पंढरपूर तालुका वगळण्यात आला आहे. या भागातील पिके सध्या जरी हिरवीगार दिसत असली तरीही भविष्यात त्याचे नुकसान लाखो रुपयात होणार आहे. त्यामुळे पीक नोंदीनुसार सरसकट मदत झाली पाहिजे.

याबाबत लवकरच पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भेटून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळाली पाहिजे. तसेच पंचनामाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

दुष्काळाची दाहकता भीषण आहे. पूर्ण पावसाळा संपला तरी जमिनीत दोन इंचसुध्दा ओल गेलेली नाही. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. काही शेतकऱ्यांची आता १०- २० टक्‍के पिके हिरवी दिसत असली तरी ती काढणी होईपर्यंत राहणार नाहीत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट ट्रिगर १ प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.
- भास्कर कोरके, शेतकरी, भोसे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news