थोडक्या शब्दांतून जाहिरातीत सांगितला जातो खूप सारा आशय

राष्ट्रीय जाहिरात दिन दै. ‘पुढारी‘त ‘सावा’कडून साजरा
Solapur News
सोलापूर ः राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त सोमवारी दै. ‘पुढारी’कार्यालयात केक कापताना ‘सावा’चे पदाधिकारी.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा

जाहिरात संस्थांमार्फत वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणार्‍या जाहिरातींचे डिझाईन आकर्षक असते. त्यातून थोडक्या शब्दांत खूप सारा आशय सांगितला जातो. यामुळे संबंधित उद्योग, व्यापार, संस्था, संघटनेस प्रसिद्धीचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. जाहिरात संस्थांमार्फत जाहिराती करून प्रचार, प्रसाराचा योग्य तो लाभ पदरात पाडून घ्यावा, असे आवाहन सोलापूर अ‍ॅडव्हरटायझिंग एजन्सी वेलफेअर असोसिएशनचे (सावा) अध्यक्ष संतोष उदगिरी यांनी केले. राष्ट्रीय जाहिरात दिन सोमवारी पार पडला. त्यानिमित्त ‘सावा’च्या प्रतिनिधींनी दै. ‘पुढारी’च्या कार्यालयास भेट दिली. त्याप्रसंगी अध्यक्ष उदगिरी बोलत होते. प्रारंभी ‘सावा’च्या पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत दै. ‘पुढारी’चे निवासी संपादक संजय पाठक, जाहिरात व्यवस्थापक सर्जेराव साळुंखे यांनी केले.

Solapur News
बेळगाव : आईस्क्रीमची शाळेत जाहिरात, पालकांना मनस्ताप

‘सावा’चे सचिव तथा जव्हेरी अ‍ॅडस्चे अक्षय जव्हेरी यांनी यावेळी जाहिरात संस्था व एकूणच जाहिरात व्यवसायावर आलेल्या संकटाविषयी मत व्यक्त करत यातून बाहेर पडण्यासाठी योग्य उपाय वेळीच व्हावेत, असे मत व्यक्त केले.‘सावा‘चे ज्येष्ठ सदस्य तथा ओंकार अ‍ॅडव्हरटायजर्सचे मोहन वैद्य यांनी जाहिरात संस्थांचा जाहिरात व्यवसाय अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी सर्वांशी चर्चा केली. यावेळी ‘सावा’चे उपाध्यक्ष तथा पोरे ब्रदर्स या जाहिरात संस्थेचे निशांत पोरे, सहसचिव तथा विराक्षी कम्युनिकेशन्सचे सचिन क्षीरसागर, खजिनदार तथा श्री स्वामी समर्थ अ‍ॅडव्हरटायजर्सचे पांडुरंग कोल्हापुरे, संजय अ‍ॅडस्चे संजय तोडकरी, सोहम अ‍ॅड एजन्सीचे रविंद्र जोगीपेटकर, समर्थ अ‍ॅडव्हरटाईजचे लक्ष्मीकांत उदगिरी, दै.‘पुढारी’चे प्रदीप जावळे, धन्यकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

Solapur News
आरबीआय चा आमिताभ यांच्या जाहिरात मानधनाची माहिती देण्यास नकार

केक कापून आनंदोत्सव

राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त दै. ‘पुढारी’च्या कार्यालयात ‘सावा’च्या पदाधिकार्‍यांनी केक कापून आनंद साजरा केला. यावेळी ‘सावा’च्या पदाधिकार्‍यांना दै. ‘पुढारी’कडून शुभेच्छापत्र प्रदान करण्यात आले. ‘सावा’कडून दै. ‘पुढारी’स सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news