Solapur gas supply: जिल्हा व महिला रुग्णालयांना पुरेसा गॅस पुरवठा

तिन्ही आरोग्य संस्थेतून सुमारे 850 रुग्णांना नियमित पुरवला जातो आहार
Gas Supply
Gas Supplypudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रूग्णालय, जिल्हा रूग्णालय आणि महिला व नवजात शिशु रूग्णालयाला गॅसचा तुटवडा नाही. आरोग्य संस्था या इर्मजन्सीमध्ये येत असल्याने पुरवठा विभागाकडून गॅसचा पुरवठा सुरळीत होत आहे. अन्य ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत असला, तरी येथील तिन्ही संस्थांना गॅस पुरवठ्यात कोणतीही व्यत्यय नाही.

येथील तीन आरोग्य संस्थेतील आंतररूग्ण विभागात दाखल रूग्णांना नियमितपणे चहा, नाष्टा व दोन वेळचे जेवण दिले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणावर गॅस लागते. रूग्णालय हे तातडीमध्ये येत असल्याने या संस्थांना पुरवठा विभागाकडून गॅस पुरवला जातो.

दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी गॅस पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा सुरळीत राहणार आहे. रूग्णालयाला शंभरटक्के गॅस पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news