Fake doctor: बोगस डॉक्टरवर कारवाई; 20 वर्षांपासून व्यवसाय

कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना ॲलोपॅथीचा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या शंकर मनोहर पाठक याच्यावर कारवाई करण्यात आली.
fake doctor
fake doctorpudhari photo
Published on
Updated on

बार्शी : तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे गेल्या 20 वर्षांपासून कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना ॲलोपॅथीचा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या शंकर मनोहर पाठक याच्यावर कारवाई करण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्र पानगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 5 मे रोजी केलेल्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आला.

डॉ. महेश पाटील यांना उपळाई ठोंगे येथील शंकर पाठक बोगस वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्याचे आदेश मिळताच डॉ. पाटील यांनी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. किरणकुमार कदम, आरोग्य सहायक कृष्णा यादव, आरोग्य सेवक साजिद मुल्ला, पोलीस पाटील संतोष सातपुते व दोन पंचांसह धाड टाकली.

पंचासमक्ष चौकशी केली असता पाठक याने स्वतःकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचे कबूल केले. दोन खोल्यांच्या दवाखान्यात रुग्णांसाठी दोन बेड, टेबल-खुर्ची, स्टेथोस्कोप, बी. पी. मशिन, थर्मामीटर तसेच मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक इंजेक्शन्स, गोळ्या आढळून आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news