सोलापूर : मोहोळ शहरात महिला डॉक्टरने गळफास घेऊन संपवले जीवन

आकस्मित मृत्यूची नोंद, पोलिसांकडून तपास सुरू
Solapur Doctor Suside
मृत डॉ.रश्मी बिराजदारPudhari Photo
Published on
Updated on

पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा

मोहोळ शहरातील महिला डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि.1) दुपारी 2 वाजता घडली. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

Solapur Doctor Suside
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शंकर बिराजदार (रा. डॉ. आंबेडकर चौक, मोहोळ) हे मोहोळ येथे स्टेशनरी दुकान चालवतात. हा ठिकाणी त्यांची 3 मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर मोहोळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असुन तेथेच दुसऱ्या मजल्यावर बिराजदार कुटुंबिय राहतात. रविवारी सकाळी साडेदहा वा.चे सुमारास दुकानामध्ये काम करण्यासाठी संतोष बिराजदार गेला होता. तो दुकानामध्ये काम करत असताना दूपारी दीड वा.चे सुमारास हॉस्पिटल मधील कर्मचारी सलीम मकानदार याने संतोष बिराजदार याला संपर्क करून मॅडम यांनी घरामध्ये गळफास घेतल्याची माहिती दिली.

Solapur Doctor Suside
नागपूर : मित्राने घेतलेली 12 लाख उधार परत न केल्याने तरुणाने संपवले जीवन

यानंतर संतोष बिराजदार हा घरी तेव्हा पत्नी डॉ.रश्मी यांनी घरामध्ये छताचे पंख्याला साडीने गळफास घेतलेला दिसला. तेव्हा संतोष आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आतुन बंद असलेला लाकडी दरवाजा तोडला.व पुढील उपचाराकरीता ग्रामीण रूग्णालय मोहोळ येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासुन डॉ.रश्मी यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले आहे. याप्रकरणी संतोष बिराजदार याने मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news