सोलापूर: टेंभू उपसा योजनेतील कालवा फोडणाऱ्या २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर: टेंभू उपसा योजनेतील कालवा फोडणाऱ्या २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Published on
Updated on

सांगोला : पुढारी वृत्तसेवा: सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याची पळवा पळवी सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुनोनीजवळ सांगोला कालवा नंबर १२/ ७०० किमी आउटलेट जेसीबी च्या साहयाने उघडून शेतकऱ्यांनी पाणी वळवल्याचा धक्कादायक प्रकास उघडकीस आला आहे. या प्रकरणी २३ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनोनी पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी महेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

विकास दादासो श्रीराम, सचिन ईश्वर श्रीराम, शिवाजी बबन काळे, शिवाजी दिगंबर व्हनमाने, दगडू विष्णु व्हनमाने, सचिन पोपट पाटील, आण्णासो ज्ञानू श्रीराम, शहाजी नाथ श्रीराम, विजय शहाजी खटके, दगडू रामचंद्र गडदे, काशीलींग महालिंग बंडगर, समाधान शहाजी पाटील, आण्णासो बंडगर (सर्व रा- जुनोनी, ता.सांगोला) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सांगोला तालुक्यात सध्या टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. अधिकाऱ्यांनी टेल टू हेड असे नियोजन केले असताना जूनोनी गावाजवळ काही शेतकऱ्यांनी जेसीबीने स्वतः दरवाजे उघडून पाणी वळवून आपल्या भागात नेल्याची तक्रार या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी अधिक र्‍याकडे केली आहे.

राजुरी, वाटंबरे, निजामपूर, कारंडेवडी, अकोला बुरूगे वाडी, कडलास, सोनंद या गावातील शेतकऱ्यांनी कालव्याची दारे काढणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी थेट पोलीस स्टेशन गाठले आहे. टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्यांना टेल मधील शेतकऱ्यांना पाणी दिल्यानंतर पाणी मिळेल, असे सांगूनही या कालव्यातून पाणी पळवा पळवी सुरू आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीच्या पाण्यावरून सांगोला तालुक्यात पाण्याची पळवा पळवी सुरू असल्याचे दिसत आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेतून सांगोला कालव्यात आवर्तन चालू झाले आहे. २०० ते २५० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे. तरी शेतकऱ्यांनी कालवा फोडू नये किंवा कालव्यामध्ये मोटारी टाकून पाणी घेऊ नये. असे प्रकार रोखण्यासाठी कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.

– सुशीलकुमार गायकवाड, उपविभागीय अभियंता, टेंभू उपसा सिंचन योजना

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news