करमाळा तालुक्यातील गावात चुलत दिराचा भावजयीवर बलात्कार; आरोपी अटकेत | पुढारी

करमाळा तालुक्यातील गावात चुलत दिराचा भावजयीवर बलात्कार; आरोपी अटकेत

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : करमाळा तालुक्यातील एका गावात चुलत दिराने भर दिवसा घरात एकटी असलेल्या भावजयीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. करमाळा पोलिसात याबाबत दाखल करण्यात आल्याने केम परिसरात खळबळ उडाली आहे. करमाळा पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली असुन 27 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने  पोलिस कोठडी ठोठावली आहे.

याबाबतची हकीकत अशी की, पीडित महिलेचा पती मजुरी व चारचाकी वाहन चालवत असल्याने तो कामावर गेला होता. ती घरात एकटीच असल्याचे पाहून विवाहितेच्या चुलत दिराने घरात घुसून भर दिवसा तिच्यावर अत्याचार केला. ही घटना 29 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता  केम येथील विवाहितेच्या घरी घडली आहे. अत्याचार केल्यानंतर सदरच्या विवाहितेला कोणाला हा प्रकार  सांगितलेस जिवे मारण्याची धमकी संशयित आरोपीने दिली होती.

यावेळी सदरच्या विवाहितेने इज्जत , धमकी व भीतीने कोणालाही ही गोष्ट सांगितली नाही. त्यामुळे या प्रकार पचल्याने पुन्हा त्या संबंधित संशयित आरोपी असलेल्याचुलत दिराने पुन्हा 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पिडितेचे घर गाठले. यावेळी पीडितेचा पती भाजी आणण्यासाठी बाजारात गेला होता. यावेळी संशयित आरोपीने घरात घुसून पुन्हा पिडीत महिलेला पकडून अतिप्रसंग करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. यावेळी सदरच्या पिडितेने आरडाओरडा करून लोकांना  बोलवण्याचा प्रयत्न केला.  यावेळी आवाज ऐकून पीडितेचे सासू सासरे हे घराच्या वरच्या मजल्यावर असल्याने त्यांनी घरात  धाव घेतली असता यावेळी संबंधित चुलत दिराने घटनास्थळावरून धूम ठोकली. याची माहिती पीडितेने तिच्या पतीला सांगितली असता त्यांनी चुलत दिराच्या विरोधात अत्याचार व विनयभंग व धमकी दिल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत करमाळा पोलिसांनी संशयित आरोपी च्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. त्याला 27 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंदनशिव हे करीत आहे.

Back to top button