Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मातेला ७०७ ग्रॅम चांदीचा मुकुट अर्पण

सोलापूरच्या राणी मुकुंद अटकळे यांच्याकडून भक्तीभावाने दान
Tuljabhavani Temple
तुळजाभवानी मातेला ७०७ ग्रॅम चांदीचा मुकुट अर्पण
Published on: 
Updated on: 

तुळजापूर : टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथील भाविक राणी मुकुंद अटकळे यांनी श्री तुळजाभवानी मातेला ७०७ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट भक्तिभावाने अर्पण केला. चांदीचा मुकुट मंदिर परिसरातील धार्मिक कार्यालयात आवश्यक नोंदणी करून मंदिर संस्थानकडे सुपूर्द करण्यात आला.

मंदिर संस्थानच्या वतीने भाविक राणी अटकळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानचे सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर, पुजारी विक्रम कदम यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी आणि पुजारी बांधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.