Vitthal Rukmini wedding
Vitthal Rukmini wedding: सात हजार भाविकांनी घेतला भोजनाचा आस्वादPudhari Photo

Vitthal Rukmini wedding: सात हजार भाविकांनी घेतला भोजनाचा आस्वाद

विठ्ठल-रूक्मिणी विवाह सोहळा उत्साहात, कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पाद्यपूजा
Published on

पंढरपूर : वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर शुक्रवार, दि.23 जानेवारी रोजी श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेचा विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विवाह सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी व सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी श्री संत तुकाराम भवन व श्री विठ्ठल-रूक्मिणी भक्तनिवास येथे अन्नप्रसादाची, भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या अन्नप्रसादाचा 7 हजार भाविकांनी लाभ घेतला.

दुपारी ठीक 4.30 वाजता श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेची पाद्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत पार पडली. या सोहळ्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. विवाह सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी व सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी श्री संत तुकाराम भवन व श्री विठ्ठल-रूक्मिणी भक्तनिवास येथे अन्नप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या अन्नप्रसादाचा सुमारे 7 हजार भाविकांनी लाभ घेतला.

अन्नप्रसादामध्ये चपाती, भरले वांगे, मटकी, बटाटा, वटाणा, रस्सा, भाजी, दही, चटणी, पापड, भजी, जिरा राईस, फोडणीचे वरण, गुलाबजामून, शिरा, बालुशाही, जिलेबी तसेच बुंदी लाडू यांचा समावेश होता. भोजनप्रसाद व्यवस्थेची जबाबदारी विभाग प्रमुख विनोद पाटील, बलभीम पावले यांच्याकडे सोपविण्यात आली होती. अन्नप्रसाद वाटपासाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवक सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news