Solapur Bribe : मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांना पोलीस कोठडी | पुढारी

Solapur Bribe : मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांना पोलीस कोठडी

माळशिरस; पुढारी वृत्तसेवा

रस्त्याच्या कामाचे बील बँकेत जमा करण्यासाठी व नवीन काम देण्यासाठी १ लाख २६ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी काल (दि.१७) सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माळशिरस नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आज त्यांना माळशिरस जिल्हा न्यायालयात हजर केले असता, जिल्हा व सत्र न्यायाधीश म. ना. पाटील यांनी, वडजे यांना २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Solapur Bribe)

माळशिरस नगर पंचायत हद्दीतील माऊली चौक ते कचरेवाडी रस्त्याच्या बिलाचा चेक जमा करण्यासाठी, १ लाख व नवीन काम देण्यासाठी २६ हजार अशी १ लाख २६ हजारांची लाच मागितली होती. (Solapur Bribe)

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची पडताळणी करून लाचलुचपत विभागाने २२ आक्टोंबर २०२१ व १ नोव्हेंबर २०२१ रोजी नगरपंचायत कार्यालयात सापळा लावला होता. परंतु डॉ. विश्वनाथ वडजे यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारली नाही. मात्र लाच मागीतल्याचे निष्पन्न झाल्याने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेऊन माळशिरस पोलीसांत गुन्हा दाखल केला होता. (Solapur Bribe)

त्यानंतर आज त्यांना माळशिरस येथील सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा :

Back to top button