

कामती: पुढारी वृत्तसेवा : मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे एसटी बसच्या धडकेत ८० वर्षीय वृद्धा जागीच ठार झाली. हा अपघात आज (दि.९) सकाळी पावणेसातच्या दरम्यान झाला. काशीबाई महादेव जाधव (वय ८०, रा. कुरुल, ता. मोहोळ) असे अपघातात मरण पावलेल्या वृद्धेचे नाव आहे.
एसटी बस चालक माणिक बापू रोकडे (रा. रोपळे, ता. पंढरपूर) यांच्याविरूद्ध कामती पोलीस ठाण्यात मृत वृद्धेची मुलगी छाया चोपडे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी पावणेसातच्या दरम्यान कुरुल बस स्टँडवर काशीबाई जाधव या रस्ता ओलांडत होते. यावेळी सोलापूरहून पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बसने (एमएच १४ बीटी ५०२७) त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. याबाबत कामती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास कामती पोलीस करीत आहेत.
हेही वाचा