सोलापूर-बार्शी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नान्नजच्या युवकाचा मृत्यू | पुढारी

सोलापूर-बार्शी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नान्नजच्या युवकाचा मृत्यू

उत्तर सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-बार्शी मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटन घडली. सोलापूर शासकीय रुग्णालयात जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. ही घटना वडाळा हद्दीतील सोलापूर बार्शी रस्त्यावर घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील परमेश्वर (देवा) दत्तात्रय झरेकर (वय ४०) त्यांचा मित्र विजय प्रल्हाद भोसले वैरागवरून (दि. ३१) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या गावाकडे येत असताना वडाळानजीक सोलापूर-बार्शी रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात परमेश्वर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजय भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत.

परमेश्वर यांना पोलीस बी.आर आत्तार यांनी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मयत परमेश्वर याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहिणी, एक मुलगा असा परिवार असून परमेश्वर याच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button