सोलापूर : धर्म-जातीच्या नावाने भाजपकडून राजकीय पोळी भाजण्याचे काम – प्रकाश आंबेडकर | पुढारी

सोलापूर : धर्म-जातीच्या नावाने भाजपकडून राजकीय पोळी भाजण्याचे काम - प्रकाश आंबेडकर

अक्कलकोट, पुढारी वृत्तसेवा : सध्या देशात द्वेषाचे राजकारण सुरू आहे. धर्म आणि जातीच्या नावाने राजकारणाची पोळी भाजण्याचे काम भाजपा आणि आरएसएस कडून सुरू आहे. ज्यावेळी देशात धर्म आणि जातीवरून राजकारण सुरू होईल त्या दिवशी देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात येईल, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. सध्या देशात धर्म आणि जातीवर आधारित राजकारण सुरू असून याचा विरोध वंचित बहुजन आघाडी सर्व ताकदीने करेल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे .

अक्कलकोट शहरातील बस स्थानकासमोरील श्री मल्लिकार्जुन मंदिरालगत वंचित बहुजन आघाडी कडून सोमवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी जन आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर बोलत होते .याप्रसंगी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर , प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद ,युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत साठे ,डॉक्टर क्रांती सावंत ,श्वेता राजगुरू , जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड , तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे ,शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले ,कामगारा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष शिलामणी बनसोडे, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे ,इरफान दावण्णा , विकी बाबा चौधरी, माजी नगरसेविका पुतळाबाई शिरसागर, हुसेन बळुर्गी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

Back to top button