सोलापूर : पती नपुंसक असल्याचा नवविवाहितेचा आरोप; पोलिसात तरुणीची फिर्याद | पुढारी

सोलापूर : पती नपुंसक असल्याचा नवविवाहितेचा आरोप; पोलिसात तरुणीची फिर्याद

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यात एका नवविवाहित तरुणीने पती शारिरीक आणि मानसिक छळ करत असल्याची पोलिसांत तक्रार दिली आहे. या फिर्यादीत या तरुणीने पती नपुंसक असल्याचे देखील माहिती फिर्यादीमध्ये दिली आहे.

याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह आठ जणांविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २०२१ मध्ये फिर्यादीचा विवाह पुणे येथील तरुणाबरोबर झाला. मध्यस्थींनी हे स्थळ सुचवले होते. लग्नानंतर कौटुंबिक कारणातून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिळ छळ करण्यात येत होता. सतत अपमानास्पद वागणूक दिली जात होती. तसेच तिला माहेरातून दहा लाख आणल्याखेरीज नांदविणार नसल्याचे पतीने म्हटले असल्याचे विवाहीत तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. याचबरोबर तरुणीने पती नंपुसक असल्याची माहिती देखील फिर्यादीमध्ये दिली आहे. ही माहिती लग्नापूर्वी सासरकडील आणि मध्यस्थींना होती. मात्र त्यांनी ही माहिती माझ्यापासून लपवून ठेवून माझ्याबरोबर विवाह लावून दिला. यामध्ये माझी फसवणूक केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक शेळके करीत आहेत.

Back to top button