

सोलापूर : देशातील आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता ‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ ही योजना राबविण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
2 ऑक्टोबर 2024 पासून ही योजना पंतप्रधानांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांतर्गत येणार्या 61 गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी योजनेचा घ्यावा घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास प्रकल्पाचे सागर नन्नवरे यांनी केले.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 25 प्राधान्य क्षेत्रे व 17 मंत्रालये निश्चित करण्यात आली आहेत. याद्वारे आदिवासी जमातीच्या सामाजिक व आर्थिक विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यातील 3 तालुक्यामधील एकूण 61 गावांचा धाराशिव जिल्ह्यातील 2 तालुक्यामधील 4 गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणाची जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती स्थापन केली. अभियानाविषयी 30 जूनपर्यंत जनजागृती सुरू आहे. अभियानात सर्व संबंधित विभागांनी सक्रिय सहभागी व्हावे व अभियानाचा लाभ आदिवासींपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राज्यात सर्वत्र राबविण्यात येत असून त्यात राज्यातील 32 जिल्ह्यांमधील 214 तालुक्यांमधील 4975 गावांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 61 गावांचा समावेश असून अक्कलकोट तालुक्यामध्ये 51 गावे, सांगोला 9, मोहोळ 1 गावामध्ये जनजागृती केली जाणार आहे. प्रत्यक्ष गावात जाऊन शिबिर आयोजित करून आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जात प्रमाणपत्र, पीएम किसान, जनधन खाते, ई-सेवा पुरविणे तसेच सिकलसेल आजाराविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य, अन्न, पंचायत राज, ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, कृषी, महसूल आदी विभागांमार्फत दिल्या जाणार्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, असे आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर कार्यालयाने सांगितले.
ग्राम उत्कर्ष अभियानातर्गत असलेल्या उपक्रमाचा आदिवासींच्या विकासासाठी असणार्या योजनांचा लाभ शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचविणे, आदिवासी क्षेत्रात सेवा व पायाभूत सुविधा पोहोचविणे, आदिवासी जमातीतील लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे.