सोलापूर : तहसीलदारांच्या नावे २५ हजारांची लाच मागणाऱ्या व्यक्तीस अटक

File Photo
File Photo
Published on
Updated on

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : अन्न धान्याची खासगी वाहने मोहोळ हद्दीतून जात होती त्यावर कोणतेही कारवाई न करण्यासाठी तहसीलदारांच्या नावाने २५ हजाराची लाच मागणाऱ्या एका व्यक्तीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. दाजीसाहेब श्रीमंत काकडे (वय ४३ वर्षे, रा. काकडे वस्ती पंढरपूर रोड, मोहोळ जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचे व त्यांचे मित्राचे अडत धान्य व्यवसायाच्या खरेदी-विक्रीचे अनुषंगाने दुकानातील धान्याची (गहु, ज्वारी व तांदुळ) टॅम्पो, छोटा हत्ती अश्या वाहनातून मोहोळ हद्दीतून वाहतुक होत होती.

सदर धान्यांच्या गाडयांवर कोणताही गुन्हा दाखल न करण्याकरीता यातील आरोपी दाजी काकडे यांनी तत्कालीन मोहोळ तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांचेकरिता म्हणून तक्रारदार यांचेकडे मासिक हप्ता स्वरुपात २५,००० रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्यास संमती दिले. यावरुन वर नमुद आरोपीस ताब्यात घेवून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया मोहोळ पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे सुरु आहे. ही कारवाई गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, उमांकांत महाडिक, पोलीस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना श्रीराम घुगे, पोना नरोटे चालक पोह गायकवाड, पोशि शाम सुरवसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news