सोलापूर : नान्नजच्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू | पुढारी

सोलापूर : नान्नजच्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

उत्तर सोलापूर पुढारी वृत्तसेवा : नान्नज (ता .उत्तर सोलापूर) येथील तरुणाचा शेतातील इलेक्ट्रिक वायरमुळे विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सावळेश्वर (ता. मोहोळ) येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १२) सकाळी मयत राहुल व त्याची पत्नी हे दोघे आपल्या दुचाकीवरून मामाच्या शेतात गेले होते. यावेळी शेतात लटकत असलेली इलेक्ट्रीकची वायर पाहून यात कुणाचा जीव जाऊ नये म्हणून स्वतः जीव धोक्यात घालून इलेक्ट्रीकची वायर ओढून बांधण्याचा राहूल यांनी प्रयत्न केला. यावेळी राहुल हा विजेचा धक्का बसल्याने बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडला. बेशुद्ध अवस्थेतील राहुल याला उपचाराकरिता त्याचे भाऊजी विकास शेंङगे यांनी त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वी राहुल याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेची नोंद सिविल पोलीस चौकीत करण्यात आली आहे. राहुल हा सातपुते कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. त्याचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. गावातील शेतकऱ्यांच्या शेतात शेतमजूर म्हणून राहुल काम करत होता. घरची सर्व जबाबदारी त्याच्यावरच होती. राहुल याच्या मृत्यूची बातमी गावात कळताच नातेवाईक व सर्वत्र हळहळ केली जात आहे. मयत राहुल याच्या पश्चात आई, वङील,पत्नी, असा परिवार आहे.

Back to top button