Solapur News : हृदयविकाराचा झटका आला अन्‌ डॉक्टरांच्या सतर्कतेने वाचला जीव

तपासणी सुरू होण्यापूर्वीच ५५ वर्षीय रुग्णाची प्रकृती झाली गंभीर
Solapur News
हृदयविकाराचा झटका आला अन्‌ डॉक्टरांच्या सतर्कतेने वाचला जीव
Published on
Updated on

सोलापूर : रेल्वेलाईन परिसरातील हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५५ वर्षीय रुग्णाला ओपीडीमध्येच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. छातीत तीव्र वेदना होत असल्याने रुग्ण उपचारासाठी आले होते. तपासणी सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली.

रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच ओपीडी स्टाफने क्षणाचाही विलंब न करता आपत्कालीन उपचार केले. डॉ. शैलेश पाटील यांनी सीपीआर केले. त्यानंतर आवश्यकतेनुसार डिफिब्रिलेशन (डीसी शॉक) देण्यात आले. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तत्पर उपचारामुळे रुग्णाला वेळेत मदत मिळाली. त्यामुळे त्या रुग्णाचा जीव वाचला. ईसीजी नॉर्मल आला तरी छातीत दुखणे, दडपण किंवा जडपणा, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास, मळमळ, चक्कर किंवा अचानक अशक्तपणा यांसारखी लक्षणे कायम असल्यास दुर्लक्ष करू नये, असा सल्ला दिला. ईसीजी हा एका क्षणाचा तपास असल्याने लक्षणे सुरू राहिल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉ. शैलेश पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news