सोलापूर : घरात कोण नसल्याचे पाहून महिलेवर अत्याचार | पुढारी

सोलापूर : घरात कोण नसल्याचे पाहून महिलेवर अत्याचार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : घरामध्ये एकट्या असलेल्या महिलेच्या घरात शिरुन तिला लाथाबुक्क्यानी मारहाण करुन तिघांकडून अत्याचार करण्याची घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यातील एका गावात रविवारी (दि. ८) सायंकाळी ६:३० च्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिलेवर सोमवारी पहाटे शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरु आहेत.

यातील पीडित ३० वर्षीय विवाहित महिला घरामध्ये एकटीच असल्याचे पाहून तिघेजण आत शिरले. महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिने जिवाचा आकांत करत असताना बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातील संशयित आरोपी पळून गेला आहे, घरातील मंडळी आल्यानंतर पिडितेने संबंधीत प्रकार सांगितला. यानंतर तिला येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन सोमवारी पहाटेच्या दरम्यान महिलेच्या नातेवाईकाने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आली. तिच्यावर उपचार सुरु असून, प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

Back to top button