जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा ३१ वर; शहरी विभागात ८ तर ग्रामीण विभागात २३ रुग्ण | पुढारी

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा ३१ वर; शहरी विभागात ८ तर ग्रामीण विभागात २३ रुग्ण

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून सोमवारी (दि. १०) आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण असून, येथे कोरोना बाधिताची संख्या १६ पर्यंत पोहोचली आहे. सद्यस्थितीत शहरी विभागातील ८ तर ग्रामीण विभागातील २३ रुग्ण आहेत. गेल्या आठवड्याभरात रुग्णसंखेत दहाने वाढ झाली आहे .

सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ३१ कोरोना बाधित रुग्ण आहे. सोमवारी करमाळा येथील एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असून केंद्र सरकार व राज्य सरकारनेही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानेही जिल्हा वासियांना खबरदारी घेण्याबाबत सुचवले आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची शिफारसही प्रशासनाने केली आहे.

Back to top button