कुर्डूवाडीत 35 जणांनी केला अवयवदानाचा संकल्प

Organs Donate | महादान संस्था-इंडियन मेडिकल असोसिएशनचा उपक्रम
Organs Donate In Solapur |
कुर्डूवाडीत 35 जणांनी अवयवदानाचा संकल्प केला. Pudhari Photo
Published on
Updated on

कुर्डूवाडी : येथील महात्मा फुले बहुद्देशीय संस्था संचलित महादान संस्था व आएमए आयोजीत कार्यक्रमात 35 जणांनी अवयवदानाचा संकल्प केला. या विषयावर जनजागृतीही करण्यात आली.

कुर्डूवाडीत बागडे निवासाच्या टेरेसवर झालेल्या कार्यक्रमाला आयएमए’ चे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, कुर्डुवाडी शाखेचे अध्यक्ष डॉ. आशिष शहा, डॉ. सचिन माढेकर, डॉ. संतोष दोशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ परबत, माजी मुख्याध्यापक विनायक गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकात महादान संस्थेचे संस्थापक श्रीनिवास बागडे यांनी े सर्वांनी आतापासून जागृत होणे गरजेचे असल्याचे सांगितले. ‘आयएमए’चे राज्य अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी यांनी जीवंतपणी व मरणोत्तर कोणते अवयव देता येतात, देहदानाची प्रक्रिया, ग्रीन कॉरिडर याबाबतची सविस्तर माहिती दिली. किडनी दानाची यशस्वी प्रक्रिया पार पाडलेले दर्शन व सारिका शिरसकर यांनी अनुभव कथन केले. माजी मुख्याध्यापक गोरे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रकाश आतकर यांनी केले. कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त मोहन गायकवाड, संकेत बागडे, अनिकेत बागडे यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news