झेडपीच्या कार्यकारी अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवा: आमदार यशवंत माने | पुढारी

झेडपीच्या कार्यकारी अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवा: आमदार यशवंत माने

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. ३६ कोटींची टेंडर प्रक्रिया झाली आहे. या टेंडर प्रक्रियेवर सध्या गोंधळ उठलाय. याच पार्श्वभूमीवर जलजीवन मिशनचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतला. या बैठकीला काही आमदार उपस्थित होते. या आढाव्यानंतर मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत प्रशासनावर हल्लाबोल केला.

यावेळी ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात सुमारे ९०० गावांमध्ये या योजनेची कामे होणार आहेत. १ हजार कोटींचा निधीचा सोलापूर जिल्हा परिषदेला आला आहे. या टेंडर प्रक्रियेत जिओ टॅगिंग हे महत्वाचे आहे. मात्र, मोहोळ तालुक्यातील वरकुटे आणि आढेगाव या गावांमध्ये जिओ टॅग न करता टेंडर दिले आहेत.

या प्रक्रियेत टेंडर परस्पर रद्द केले जातात. त्यामुळे निश्चितच या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होते. जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे यात केवळ अधिकारी आणि मक्तेदारांना पोसण्याचे काम होत होत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामीण पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास सक्तीच्या रजेवर पाठवून सर्व टेंडर रद्द करा. यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी आमदार माने यांनी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button