सोलापूर : राज्यात सत्ता परिवर्तन, पण चिंचपूर ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचा झेंडा | पुढारी

सोलापूर : राज्यात सत्ता परिवर्तन, पण चिंचपूर ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचा झेंडा

दक्षिण सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या जय हनुमान विकास पॅनलने सातही जागा जिंकून ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर दक्षिण तालुक्यातील चिंचपूर आणि मनगोळी या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती.

या निवडणुकीत भाजपचे आमदार सुभाष देशमुख पुरस्कृत सिध्दाराम जानकर यांच्या पॅनलचा युवासेनेचे तालुका प्रमुख धर्मराज बगले यांच्या जय हनुमान विकास पॅनलने दारूण पराभव करत पुन्हा एकदा चिंचपूर ग्रामपंचयातीवर आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले.
राज्यातील सत्ता परिवर्तनाचा आगामी निवडणुकांवर परिणाम होणार असल्याचे वर्तविण्यात येत होते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या चिंचपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button