भाजपची हुकूमशाही फार काळ चालणार नाही | पुढारी

भाजपची हुकूमशाही फार काळ चालणार नाही

हंजगी : पुढारी वृत्तसेवा जनता आता सूज्ञ झाली आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर सुरू केला आहे, त्यामुळे ही भाजपची हुकूमशाही फार काळ टिकणार नाही. त्यांना जनता येत्या निवडणुकीमध्ये योग्य तो धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या इडी चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे अक्कलकोटमध्ये सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. म्हेत्रे म्हणाले, भाजपच्या विरोधात जो जातो त्यांना ईडी व अन्य चौकशी यंत्रणेकडून त्यांच्यावर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. मागच्या काळात काँग्रेसचीही सत्ता होती, पण अशाप्रकारे त्यांनी कधीच केले नाही.

ए-वन चौक येथील हुतात्मा स्मारकाजवळ कारगिलदिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. अर्धा ते पाऊण तास हे आंदोलन चालले. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ नेते अशपाक बळोरगी, काँग्रेस शहराध्यक्ष बसवराज अळोळी, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, बाबासाहेब पाटील, सुनीता हडलगी, मेधा बिराजदार, समीर शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button