सांगोला : सूतगिरण निवडणूक : छाननी तीन महिन्यांनी | पुढारी

सांगोला : सूतगिरण निवडणूक : छाननी तीन महिन्यांनी

सांगोला : पुढारी वृत्तसेवा शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 74 अर्ज उमेदवारांनी दाखल केले आहेत. संस्थेच्या स्थापनेपासून सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली होती; पण उमेदवारांनी भरलेल्या अर्जार्ंची संख्या पाहता या सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन अर्ज भरलेल्यांची छाननीपासूनची प्रक्रिया पुढे होणार आहे. दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी सहकारी सूतगिरणीची प्रथमच निवडणूक होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कामगार पक्षापुढे विरोधी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) भाजपचे मोठे आव्हान असणार आहे. असे असले तरी डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रा. नानासाहेब लिगाडे, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, प्रा. पी.सी. झपके, बाबुराव गायकवाड यांचीही शेतकरी सूतगिरणीच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या दृष्टीने शेकापचे नेते ‘बिनविरोधची’ चाचपणी करीत आहेत.

सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या 17 जागांसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून -7 जागांसाठी 24 अर्ज, बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून -4, जागांसाठी 23 अर्ज संस्था मतदार संघातून 1 जागेसाठी सात अर्ज, अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघ -1 जागेसाठी 3 अर्ज, महिला प्रतिनिधी मतदारसंघ-2 जागांसाठी 3 अर्ज, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघ -1 जागेसाठी सहा अर्ज, भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी -1 जागेसाठी 8 अर्ज असे एकूण 17 जागांसाठी 74 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या 11 हजार 560 सभासदांपैकी कापूस उत्पादक शेतकरी 7 हजार 93, तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी 4 हजार 467 असे एकूण 11 हजार 560 सभासद ( मतदार ) आहेत, तर संस्था प्रतिनिधी मतदारांची संख्या 81 आहे.
शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीसाठी पुढीलप्रमाणे अर्ज भरण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने विद्यमान चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे, चंद्रकांत देशमुख, बाबुराव गायकवाड, बाळासाो काटकर, बाबासाो कारंडे, गोंविद जाधव, शहाजी नलवडे, विनायक कुलकर्णी, दत्तात्रय खरात, दिलीप घुले, गोकुळा ऐवळे, संभाजी पाटील, सागर लवटे, परमेश्‍वर उबाळे, मच्छिंद्र लवटे, दादा धांडोरे, विश्‍वंभर काशीद, महेंद्र बाजारे, संतोष देवकते, सीतादेवी चौगुले, बाळकृष्ण कांबळे, नितीन गव्हाणे, विशालदीप बाबर, मधुकर कांबळे, अजय देशमुख, भारत बंडगर, बाळासाहेब बनसोडे, ताई मिसाळ, शिवाजी मिसाळ, संतोष पाटील, दीपक जाधव, विक्रांत गायकवाड, विठ्ठल शेंबडे, अमेय लोखंडे, वसंत सुपेकर, पांडुरंग बंडगर, साहेबराव जगदाळे, अंकुश बागल, प्रभाकर माळी, अजय देशमुख, आनंद घोंगडे, दिलीप देशमुख, चंद्रकांत शिंदे, अंकुश येडगे, राजेंद्र गावडे, प्रल्हाद येलपले, चिदानंद स्वामी, कुंडलिक आलदर, हरिबा पुकळे, रामचंद्र जाधव, अंकुश बागल, दिलीप मरगर, संजय इंगोले, कृष्णदेव घाटोळे, अण्णासाहेब देशमुख, दीपक गोडसे, पोपट गडदे, दिलीप सुतार, अनिल घोंगडे यांचा समावेश आहे.

छाननीपासूनची प्रक्रिया पुढे सुरू राहणार
उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगाने सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. यामुळे पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन अर्ज भरलेल्यांची छाननीपासूनची प्रक्रिया पुढे होणार आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक तारीख जाहीर झाली तरी नव्याने अर्ज भरता येणार नाहीत.

Back to top button