सोलापूर : जिल्हाधिकार्‍यांसह अनेक अधिकारी वारकर्‍यांच्या वेशात | पुढारी

सोलापूर : जिल्हाधिकार्‍यांसह अनेक अधिकारी वारकर्‍यांच्या वेशात

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात हरित वारीचा शुभारंभ जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सिईओ दिलीप स्वामी व पालखी सोहळ्याचे विश्वस्त यांचे हस्ते सोमवारी करण्यात आला. जिल्ह्यात प्रवेश होणार्‍या पालखीसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह अनेक अधिकारी पारंपारिक वारकर्‍यांच्या वेषात सहभागी झाले होते. पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सिईओ दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी वारकरी वेशभूषेत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. डोक्यावर पांढरा शुभ्र फेटा, गळ्यात उपरणे पांढरा शर्ट व पायजमा घालून सर्वसामान्य वारकर्‍याप्रमाणे त्यांनी आदराने वारकरी बांधवांचे स्वागत केले.

या प्रंसगी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, माजी आमदार रामहरी रूपवनर, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, उप जिल्हाधिकारी सचिन ढोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, माळशिरसचे तहसीलदार जगदिश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते.

सातारा प्रशासनाने दिला पालखीला निरोप

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी माऊलींच्या पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत आणून सोडला. जिल्ह्यात पालखीचे आगमन झाल्यावर पालखी सोहळ्यातील विश्वस्त व वारकरी, सोलापूर जिल्हा प्रशासनाची अधिकारी यांच्या समवेत हरीत वारीतील वृक्षारोपन मोहिमेत सहभागी झाले.
उमेद कर्मचारी यांनी दिली

सॅनिटरी नॅपकिन ची सेवा

पालखी सोहळ्यातील महिलांसाठी खास हिरकणी कक्ष तयार करणेत आला आहे. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सिईओ दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे हस्ते सॅनिटरी नॅपकिन च्या मशीन चे लोकार्पण करणेत आले. महिला वारकरी यांनी नॅपकिन चा डेमो देणेत आला.

स्वच्छता दिंडीचा उपक्रम

पालखी सोहळ्यात चित्ररथाद्वारे कलाकारांनी वारकरी बांधवांना स्वच्छतेचे धडे दिले. पालखी सोहळ्यात उभारलेले शौचालयाचा वापर करा, प्लास्टीक इतरत्र टाकू नका, प्लास्टीक संकलन केंद्रात कचरा टाका, उघड्यावर शौचविधीस जाऊ नका, वृक्षारेपन मोहिमेत सहभागी व्हा असे विविध कलाप्रकारा मध्ये वारकर्‍यांचे मनोरंजनातून प्रबोधन करत त्यांनी स्वच्छतेचा व पर्यावरणाचा संदेश दिला.

Back to top button