सोलापूर : टँकरमध्ये चोरटा कप्पा करून 308 लिटर डिझेलची चोरी

टँकरमध्ये चोरटा कप्पा करून 308 लिटर डिझेलची चोरी
टँकरमध्ये चोरटा कप्पा करून 308 लिटर डिझेलची चोरी

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा टॅकरमध्ये चोरटा कप्पा करून डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. ट्रान्सपोर्टचालकांसह तिघांना अटक केली. अद्यापही एकजण फरार असून पोलिसांनी टँकर जप्त केला आहे. रामशरण द्वारकाप्रसाद यादव (रा. प्लॉट नं. 62, रा. शिवाजी नगर, बाळे, सोलापूर), रंगसिध्द दत्तू मळगे (रा. जामगाव, ता. मोहोळ), अनिल सुभाष बिराजदार (रा. घुगी सांगवी, ता. शिरूर आनंदपाल, जि. लातूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून बाबासाहेब जालिंदर ठराव (रा. शिरपूर, ता. मोहोळ) हा फरार आहे. याबाबत उमेश धनराज चव्हाण (वय 36, रा. 10/22, विद्यानगर, पाथरूट चौक, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या तिघांनाही न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. उमेश चव्हाण यांचा तोगराळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे भारत पेट्रोलियमचा पंप आहे. चव्हाण यांच्या पेट्रोल पंपावर 20 जून रोजी दुपारी पाकणी येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या डेपोतून एमएच 13 सीयू 6803 टँकरमधून 10 हजार लिटर पेट्र्रोल व 10 हजार लिटर डिझेल आले होते. त्यावेळी चव्हाण यांना टँकरमध्ये डिझेल कमी असल्याचे आढळून आले. चव्हाण यांनी याबाबत वळसंग पोलिस ठाण्याचे अधिकारी अतुल भोसले यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन टँकरमधील डिझेलची मोजणी केली असता 24 हजार 428 रुपये किंमतीचे 308 लिटर डिझेल कमी मिळून आले. टँकरच्या पाठीमागील बाजूस वेल्डींग करून चोरटा कप्पा करून त्यामध्ये डिझेल असल्याचे आढळून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news