सांगोला-पंढरपूर परिसरातील 9 जण तडीपार

सांगोला-पंढरपूर परिसरातील 9 जण तडीपार

Published on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सांगोला-पंढरपूर परिसरातील अट्टल गुन्हेगारांच्या 3 टोळ्यांमधील 9 जणांना एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. अनिकेत बापूराव काळे, अक्षय विजय इंगोले (रा. वज्राबादपेठ, सांगोला), रविराज दिलीप मस्के (रा. एखतपूर रोड, मस्के कॉलनी, सांगोला), अजिंक्य बिरूदेव माने (रा. धनगर गल्ली, सांगोला), लखन रामचंद्र चव्हाण (रा. सांगोला), शंकर उर्फ बिनू लिंगा भोसले (रा. आंबे, ता. पंढरपूर), विकास अण्णा गोडसे (रा. आंबे, ता. पंढरपूर), महेश जिवाप्पा कोळी (रा. आंबे, ता. पंढरपूर), भैया उत्तम शिंदे (रा. आंबे, ता. पंढरपूर) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक यांनी तडीपारीचे आदेश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news