नीती आयोगाच्या मानकांचा कलाल यांच्याकडून आढावा | पुढारी

नीती आयोगाच्या मानकांचा कलाल यांच्याकडून आढावा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा नीती आयोगाचे आरोग्याचे उपसचिव शोएब अहमद कलाल हे सोलापूर दौर्‍यावर असून त्यांनी बुधवारी नीती आयोगाच्या मानकांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते. दौर्‍यामध्ये कलाल यांनी डॉ. व्ही. एम. वैद्यकीय महाविद्यालय येथे सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य विभागातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने माता व बाल आरोग्य, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य अभियान, हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटर, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम इ. कार्यक्रमांचा समावेश होता.

दौर्‍यात त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणीदेखील केली. दाराशा नागरी आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच त्यांनी निर्माणाधीन महिला रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांच्या बांधकामाची पाहणी केली.

यावेळी राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे

सहायक संचालक डॉ. अनिरुद्ध देशपांडे, डॉ. व्ही एम वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक गणेश जगताप आदींची उपस्थिती होती.

Back to top button