सोलापुरात पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

सोलापुरात पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापुरातील सदर बझार पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. नाना बेशा शिंदे असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. केवळ 500 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने सापळा रचून  कारवाई केली.

एका गुन्ह्याच्या तपासकामी तडजोड करुन सहकार्य करतो यासाठी पोलीस नाईक नाना शिंदे यांनी लाच मागितली होती. सोलापुरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पोलीस कर्मचारी बळीराम माशाळकर बडतर्फ 

पोलीस कर्मचारी बळीराम माशाळकर याला महिनाभरापूर्वी निलंबित केले होते. बेशिस्त वर्तन आणि वागणुकीत बदल होत नसल्याने पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी बडतर्फीची कारवाई केली.

Back to top button