सोलापूर : आजोबा गणपतीची १८ तास मिरवणूक

सकाळी झाले विसर्जन; पारंपरिक वाद्यांचा गजर
Ajoba Ganpati Solapur
आजोबा गणपतीPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

ढोल-ताशांच्या गजरात, मर्दानी लेझीम डाव सादर करत मंगळवारी (दि. 17) मिरवणूक सुरू झाली. अखंड 18 तासांच्यामिरवणुकीनंतर बुधवारी (दि. 18) सकाळी सहा वाजून 32 मिनिटांनी मानाच्या आजोबा गणपतीचे विसर्जन सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाट येथे करण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह मंडळांनी विविध प्रकारच्या देखाव्यांवर भर दिला होता. मंगळवारी दुपारी अडीच वाजता विधिवत पूजा करून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी चिदानंद वनारोटे, सुनील जवळकर, सिद्धारूढ निंबाळे, रामचंद्र रेळेकर, शिवानंद मेंडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मिरवणुकीमध्ये मुलामुलींचे 200 ढोल पथक, 120 जणांचे लेझीम पथक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आजोबा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Ajoba Ganpati Solapur
घरगुती गौरी-गणपती आज विसर्जन; जाणून घ्या विधीतील ५ मुद्दे

मिरवणूक मार्गावर 12 फुटी, 15 फुटी फुलांचे हार, नवसाचे पेढे, मोदक, चुरमुरे, गुलाल उधळण करून भक्तीला उत्साह आला होता. माणिक चौक, दत्त चौक, राजवाडे चौक, पंजाब तालीम, मल्लिकार्जुन मंदिर, टेलिफोन भवन, सराफ कट्टा, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक मार्गे सिद्धेश्वर तलाव विष्णू घाट येथे बुधवारी सकाळी सहा वाजून 32 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले. पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दत्त चौकातून मिरवणुक काढण्यात आली. पाणीवेस तालीमचे आधारस्तंभ चंद्रकांत वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दमदार लेझीमचा डाव सादर करून लक्ष वेधून घेतले. दरम्यान यावेळी पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गुलालाची मुक्तपणे उधळण करण्यात आल्याने मिरवणुकीत रंगत आली. पाणीवेस तालीमची मिरवणूक पाहण्यासाठी दत्त चौकात मोठी गर्दी झाली होती.

थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीची सुरुवात दत्त चौक येथुन करण्यात आली. प्रारंभी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते गणपतीची पूजा झाली. यावेळी थोरला मंगळवेढा तालीमच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर दमदार आणि बहारदार लेझीमचा डाव सादर केला. मिरवणूक पाहण्यासाठी दत्त चौक परिसर गर्दीने फुलून गेला होता. होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ अंतर्गत येणार्‍या राजा गणपतीच्या वतीने मोठ्या जल्लोषात श्री गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. दाजी पेठ येथील मानाचा अप्पा गणपती प्रतिष्ठान च्या वतीने प्रति वर्षी प्रमाणे मोठ्या जल्लोषात श्री गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आली.

यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर बहारदार आणि दमदार लेझीमचा डाव सादर केला. पूर्व विभाग प्रमुख मानाचा ताता गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात श्री गणेश विसर्जन मिरवणुक काढली. ताता गणपतीच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत श्री निलकंठेश्वर ढोल व ताशा पथकाने दमदार ढोलची प्रात्यक्षिके सादर करून लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. काही मंडळांनी महाप्रसादाचे वाटपही केले. गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शांततेत पार पडल्या.

Ajoba Ganpati Solapur
गणपती विसर्जन मिरवणूकीची गिरीश महाजन यांनी ढोल वाजत केली सुरूवात

आजोबा गणपतीच्या सुपारीचे प्रतीकात्मक विसर्जन

आजोबा गणपतीची प्रतिष्ठापनाही सुपारीच्या रूपात केली जाते. या मूर्तीचे पाण्यात विसर्जन होत नाही. उत्सव मिरवणूक निघाल्यानंतर विसर्जनाच्या दिवशीही विधिवत पूजा करून सुपारीचे विसर्जन होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news