स्वच्छतेसाठी राबतात 1,627 कामगारांचे हात

शहरातील रस्ते, गटारीतील गाळ काढण्यासह स्वच्छता गतीने
Solapur News|
Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर: शहरातील विविध रस्ते दैनंदिन झाडणे, तुंबलेली भूमिगत गटारी पूर्ववत करणे आणि विविध ठिकाणी असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई करणे आदींसह शहर स्वच्छ करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे एक हजार 627 कामगारांचे हात राबत आहेत.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने शहरातील विविध रस्ते महिला आणि पुरुष झाडूवाल्यांकडून दैनंदिन झाडण करून घेतली जाते. यासाठी 592 महिलांसह पुरुष रस्ते झाडतात. यांचे कामकाज पहाटेच सुरू होते. विभागीय कार्यालयनिहाय या कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाते. प्रत्येक झाडूवाल्या कर्मचारी यांना रस्त्याच्या दर्जावरून विशिष्ट अंतर रस्ते झाडण्यासाठी ठरवून दिली जाते. शिवाय, ते झाडतात की नाही हे पाहण्यासाठी सुपरवायझर असतात. तसेच शहरातील विविध झोपडपट्टीसह अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैनंदिन स्वच्छता करावी लागते. यासाठी 437 सफाई कामगार अविरतपणे काम करतात. पावसाळ्यात आणि अन्य वेळी तुंबलेल्या गटारीतील गाळ काढणे आणि गाळाने भरलेले चेंबर स्वच्छ करणे आदी कामे नेहमीच चालू असतात. यासाठी 464 बिगारींची नेमणूक केलेली आहेत. तसेच झाडूवाले, सफाई कामगार बिगारी यांच्या गैरहजेरीत काम करइण्यासाठी 78 बदली कामगार आहेत. तसेच कायम नसलेले आणि नियमित काम करत असलेले 56 रोजंदारी बिगारी म्हणून काम करीत आहेत.

अशा प्रकारे शहर स्वच्छ करण्यासाठी मानपाच्या घनकचरा व्यवस्थापनातील अनेक कर्मचारी काम करीत आहेत. निसंकोचपणे शहर स्वच्छ करण्याची मोठी जबाबदरी यांच्यावर आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल असे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे असल्यास ते ज्या रस्त्यावरून ये-जा करणार असतात त्याच्या स्वच्छतेसाठी यांची दमछाक होते. अशा वेळी विविध भागातील कर्मचारी यांची एकाच परिसरात नेमणूक करावी लागते.

एका झाडूवाल्या कर्मचार्‍याला कच्चा रस्ता 500, मध्यम रस्ता 700 आणि चांगला रस्ता असेल तर 900 मीटरचे अंतर मोजून दिले जाते आणि त्याची झाडण करून घेतली जाते. लाड समितीच्या शिफारसीनुसार शहरात अलीकडेच 350 झाडूवाल्यांची भरती केली आहे. यामुळे शहरातील बहुतांश रस्ते स्वच्छ होतात.
- नागनाथ बिराजदार, घनकचरा व्यवस्थापन विभाग, मनपा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news